न्यूगोच्या ऐतिहासिक काश्मीर ते कन्याकुमारी (ई-के२के) इलेक्ट्रिक बस मोहिमेला नितीन गडकरी यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर (Nitin Gadkari) : न्यूगो या ग्रीनसेल मोबिलिटीच्या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक बस ब्रँडने ऐतिहासिक काश्मीर ते कन्याकुमारी (E-K2K) (ई-के२के) इलेक्ट्रिक बस मोहिम सुरू केली आहे. हा ऐतिहासिक प्रवास भारतात शाश्वत सार्वजनिक परिवहनाला चालना देण्यामधील मोठी झेप आहे. या मोहिमेसह (Newgo Electric Bus) न्यूगो असे विक्रमी यश सपांदित करण्यासाठी जगातील पहिला ईव्ही बस ब्रँड बनण्यास सज्ज आहे. न्यूगोचा समुद्रसपाटीपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत ३,५०० फूट उंचीवर ४,००० किमीहून अधिक अंतर पार करण्याचा ध्यास आहे.
समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीपर्यंत २०० हून अधिक नगर व शहरांमधून ४००० किमीहून अधिक अंतरापर्यंत उत्सर्जन-मुक्त प्रवास करणारी, या प्रवासाचा ऑन-ग्राऊंड क्रियाकलापांच्या माध्यमातून सार्वजनिक परिवहनासाठी अपरिहार्य सोल्यूशन म्हणून इलेक्ट्रिक बसेसबाबत जागरूकता निर्माण करण्याचा ध्यास आहे. जेथे ‘द ई-बस दॅट गोज गुड’ दर्जाचा अवलंब करण्यात येणार आहे.
ही इलेक्ट्रिक बस २०० हून अधिक शहरे व नगरांमधून जाताना भारताच्या संपन्न सांस्कृतिक वारसाचे प्रतीक म्हणून सेवा देईल. तसेच शाश्वततेचा संदेश प्रसारित देखील करेल. (E-K2K) ई-के२के बस संपूर्ण प्रवासादरम्यान सकारात्मक परिणाम घडवून आणेल. ज्यासाठी विविध अर्थपूर्ण क्रियाकलाप राबवेल. यामध्ये विद्यार्थी कार्यशाळा, वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम आणि सुरक्षितता-थीम असलेले नुक्कड नाटक यांचा समावेश आहे. प्रवासादरम्यान असे प्रभावी उपक्रम राबवण्यामधून ‘द ई-बस दॅट गोज गुड’ दर्जा दिसून येतो.
नागपूरमध्ये भारत सरकारचे माननीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी न्यूगोच्या ई-के२के इलेक्ट्रिक बसच्या पश्चिम भागातील मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, “मला आनंद होत आहे की, न्यूगोने ४,००० किमीहून अधिक अंतर पार करत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा ऐतिहासिक इलेक्ट्रिक बस प्रवास सुरू केला आहे. या प्रवासादरम्यान इलेक्ट्रिक मास मोबिलिटीबाबत जारूकतेचा प्रसार केला जाईल. तसेच २०० हून अधिक नगर व शहरांमधून प्रवास करताना विद्यार्थी व समुदायांसोबत विविध प्रभावी उपक्रम देखील राबवण्यात येतील. इलेक्ट्रिक बसेस भावी पिढ्यांकरिता आरोग्यदायी, अधिक शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि भारत सरकारने इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) अवलंबतेला भक्कम पाठिंबा दिला आहे. (Newgo Electric Bus) न्यूगोच्या ई-के२के प्रवासामधून देशातील चार्जिंग पायाभूत सुविधेमधील मोठ्या सुधारणा आणि लांब पल्ल्याच्या अंतरापर्यंत प्रवास करण्याची इलेक्ट्रिक बसेसची क्षमता दिसून येते. हा उपक्रम नाविन्यता आणि हरित तंत्रज्ञानाप्रती भारताची कटिबद्धता अधिक दृढ करतो.”
ग्रीनसेल मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक देवंद्र चावला यांनी भारतातील हरित मास मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी गरजेवर भर दिला. चावला म्हणाले की, “न्यूगोची महत्त्वाकांक्षी ई-के२के मोहिम काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ४,००० किमीहून अधिक अंतरापर्यंत प्रवास करेल, ज्यामधून विविध प्रदेशांमधून प्रवास करण्याची इलेक्ट्रिक बसेसची क्षमता दिसून येईल. ही मोहिम रेकॉर्ड-ब्रेकिंग यशापेक्षा अधिक आहे. भारताच्या संपन्न सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे. २०० हून अधिक शहरे व नगरांमधून प्रवास करत या मोहिमेचा प्रवासाच्या शुद्ध मोड्सबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आणि ईव्ही बसेसचा अवलंबतेला चालना देण्याचा मनसुबा आहे. विविध प्रभावी क्रियाकलापांमध्ये सामील होत, ई-के२के बस ‘द ई-बस दॅट गोज गुड’ दर्जाला सादर करते, तसेच नाविन्यता आणि हरित तंत्रज्ञानाप्रती भारताच्या कटिबद्धतेला दाखवते.”
या प्रवासाला ४ ऑक्टोबर रोजी जम्मूमधून सुरूवात झाली. नयनरम्य दऱ्यांपासून गजबजलेल्या शहरांपर्यंत भारतातील संपन्न सांस्कृतिक विविधतेला दाखवण्यासाठी या मोहिमेची रचना करण्यात आली आहे. तसेच ही मोहिम विविध प्रदेशांमध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या व्यावहारिकतेला देखील दाखवेल. हा प्रवास पुढे जाईल, तसे (Newgo Electric Bus) न्यूगोच्या इलेकिट्रक बसेस भारतभरातील समुदायांना प्रेरित करत राहतील. इलेक्ट्रिक गतीशीलतेचे फायदे आणि व्यक्ती व पर्यावरणासाठी शुद्ध परिवहन सोल्यूशन्सचा अवलंब करण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकतेचा प्रसार करत राहिल. (Newgo Electric Bus) न्यूगो इलेक्ट्रिक बसेस सुरक्षितता व आरामदायीपाासाठी अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज आहेत. ज्यामधून प्रवाशांना प्रीमियम प्रवासाचा अनुभव मिळेल. तसेच उत्सर्जनाचा पर्यावरणावरील परिणाम कमी होईल.