देवणी (Nitin Gadkari) : आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत. ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे.त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करत आमदार करा. निवडणुकी नंतर केवळ आमदार नाही तर मंत्री म्हणून ते काम करतील. संभाजीरावांना मंत्रिपद मिळण्याची हमी मी घेतो,असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील रेल्वेमार्गासाठी आपण आ. निलंगेकरांच्या (MLA Sambhajirao Patil Nilangekar) पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (MLA Sambhajirao Patil Nilangekar) यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जन स्वाभिमान सभेत गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. या सभेस आ. शरणू सलगर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर,व सुनिल गायकवाड, वीरुपाक्ष महाराज मुखेडकर, माजी आमदार गोविंद केंद्रे व प्रकाश खंड्रे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख,तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, मंगेश पाटील, कुमोद लोभे,माजी जि.प.सदस्य रामचंद्र तिरुके,संजय दोरवे, गोविंद चिलकुरे, प्रशांत पाटील, शिवानंद हैबदपुरे,भगवान पाटील तळेगांवकर,शिवसेना उप जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कल्याणाच्या योजना राबविल्या जात आहेत.सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गावे एकमेकांशी जोडली. सरकारची ही प्राथमिकता आहे.काँग्रेसला ६० वर्षात जे करता आले नाही ते आम्ही १० वर्षात करून दाखवले.भारताला विश्वगुरू बनवणे हे आपले ध्येय आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत,ग्रामीण व कृषीमध्ये अग्रेसर भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.देशाला सुखी,समृद्ध व संपन्न बनवायचे असेल,राज्याला सुखी ठेवायचे असेल,राज्यातील गरिबी व जातीयता दूर करायची असेल तर योग्य हातात सत्ता देण्याची गरज असल्याचेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (MLA Sambhajirao Patil Nilangekar) हे स्वतःच्या ताकदीवर जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडविणारे प्रभावी आमदार आहेत. त्यांच्या पाठीशी राहत प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. ग्रामीण क्षेत्र विकासामध्ये आ. संभाजीराव पाटील यांचे काम मोठे आहे.अक्कांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करताना विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हलवण्यास विरोध असताना आ.संभाजीराव पाटील शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते.हा पुतळा न हलविण्याच्या सूचना आ. निलंगेकर यांच्यामुळेच आपण दिल्याचेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
यावेळी बोलताना आ. निलंगेकर (MLA Sambhajirao Patil Nilangekar) यांनी सांगितले की, मतदारसंघाच्या विकासासाठी जे- जे मागितले ते सर्व देण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे.दिल्लीत महाराष्ट्राच्या हक्काचा व विश्वासाचा माणूस अशी गडकरी (Nitin Gadkari) यांची ओळख आहे.लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात लक्ष घालावे अशी मागणी करत देवणी गोवंशाचे संवर्धन व्हावे तसेच हंचनाळ ते धनेगाव व राणी अंकुलगा येथील पुलांना मंजुरी देण्याची मागणी आ. निलंगेकर यांनी आपल्या भाषणात केली.
काँग्रेस व आघाडीकडून जनतेला ‘कन्फ्युज’ करण्याचे काम काँग्रेसने विकासकामे केली नाहीत. त्या पक्षाला विकासाचे राजकारण करता आले नाही. त्यामुळेच काँग्रेस व महाविकास आघाडी कडून जनतेला ‘कन्फ्युज’ करण्याचे काम केले जात असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या सभेत बोलताना सांगितले.