इंफाळ (Manipur President Rule) : मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या (Manipur violence) हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता. बिरेन सिंग (Biren Singh) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू (Manipur President Rule) करण्यात आली आहे. वास्तविक, बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर, मणिपूरमध्ये राजकीय संकट निर्माण झाले होते, कारण त्यांनी राजीनामा देऊन 3 दिवसांहून अधिक काळ लोटला होता.
माहितीनुसार, राज्यात पूर्णवेळ मुख्यमंत्री नाही आणि 6 महिन्यांत विधानसभा (Manipur President Rule) अधिवेशन बोलावण्याची अंतिम मुदत आज संपली आहे. तथापि, एन. बिरेन सिंग हे कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून राज्याचे कामकाज पाहत होते.
बिरेन सिंह (Biren Singh) यांच्या राजीनाम्यानंतर, नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यासाठी भाजप नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. परंतु, गुरुवारी सायंकाळपर्यंत भाजपला नवीन मुख्यमंत्री निवडता आला नाही आणि विधानसभेचे अधिवेशनही बोलावण्यात आले नाही. यामुळे मणिपूरमध्ये (Manipur President Rule) राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. संविधानाच्या कलम 174 (1) नुसार, राज्य विधिमंडळांना त्यांच्या शेवटच्या बैठकीपासून सहा महिन्यांच्या आत बैठक घेणे बंधनकारक आहे. मणिपूरमधील शेवटचे विधानसभेचे अधिवेशन 12 ऑगस्ट 2024 रोजी बोलावण्यात आले होते.
मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर 2 वर्षांनी राजीनामा
मे 2023 मध्ये, मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार (Manipur violence) सुरू झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे, एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा सादर केला होता. बिरेन सिंग (Biren Singh) यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेसने म्हटले होते की, विधानसभेत काँग्रेसच्या नियोजित अविश्वास प्रस्तावापूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग (Biren Singh) यांचा राजीनामा (Manipur President Rule) मणिपूरच्या लोकांना वाचवण्यासाठी नाही तर भाजपला वाचवण्यासाठी आहे. कारण जवळजवळ दोन वर्षांपासून जातीय हिंसाचार सुरू आहे.