मानोरा(Washim):- नागपूर येथे नुकतेच मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) म्हणून समावेश झालेल्या ना. संजय राठोड यांनी दि. १६ डिसेंबर रोजी बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथे देवी जगदंबा माता मंदीरात व संत सेवालाल महाराज, संत डॉ रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळी तसेच संत बामणलाल महाराज, संत जेतालाल महाराज, सामकी माता मंदीर, धर्मपीठ भक्तिधाम येथे देवी व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. यावेळी देवी व संताची आरती, आरदास, भोगभंडारा अर्पण करून भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी धर्मगुरु आमदार बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत सुनिल महाराज, महंत शेखर महाराज, शेखर राठोड महाराज, महंत अभिमान महाराज, शेखर राठोड महाराज, माजी जि. प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, जानूसिंग महाराज, प्रकाश राठोड, प्रा. राजेश चव्हाण यांच्यासह भाविक भक्त व समर्थकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. तिर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरी येथे ना . राठोड यांचा मंत्री मंडळात समावेश झाल्याच्या आनंदात समर्थकानी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.