हजारो समर्थकांच्या उपस्थितीत व भव्यशक्ती प्रदर्शन करीत रॅली द्वारे नामांकन दाखल
पुसद (MVA Sharad Maind) : पुसद विधानसभा मतदारसंघ-81 मध्ये नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दि.२९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद (Sharad Maind) यांनी हजारोंच्या उपस्थितीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.
पुसद अर्बन बँकेचे पाचव्या टर्ममध्ये सुमारे तेवीस वर्षापासून अध्यक्ष पद भूषविणारे आणि समाजकारणात सतत सक्रिय असणारे शरद मैंद (Sharad Maind) यांनी दि.२९ रोजी दुपारी १:०० वाजता सुमारे पाच ते सात हजार महिला व पुरुष समर्थकांसह प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालया च्या समोरील प्रांगणात भव्य शामियाना उभारून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुसद विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैंद यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे सर्वच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्याच्यानंतर एलआयसी कार्यालय मुखरे चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. गेल्या पाच वर्षापासून पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये कुठलेही विकासात्मक काम योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. ज्या तालुक्याला दोन दोन मुख्यमंत्री मिळाले तरीही तालुक्यातील काही भाग पाण्यापासून वंचित आहे.
समस्या व मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शरदमैंद यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन मान्यवरांनी केले. विचार मंचावर प्रामुख्याने एड. आप्पाराव मैंद, विजयराव चव्हाण, डॉ. नदीम, वसंतराव पाटील कान्हेकर, पंजाबराव खडकेकर, शिवाजी राठोड, शिलानंद कांबळे, राजेंद्र साकला विकास जामकर रवी पांडे संतोष दरने, विद्यांजली पोहरकर, हरीश गुरुवाणी मोहन विश्वकर्मा, नाना जळगावकर, नारायण क्षीरसागर, किशोर दादा कांबळे, अनिल ठाकूर शिवाजी देशमुख सवनेकर, परमेश्वर जयस्वाल , एड संजय भोने, उदय गंदेवार इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.