हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : शासनाच्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाच नाव मी दक्ष असले तरी केवळ मी दक्ष होऊन जमणार नाही तर आम्ही सारे दक्ष असलो तरच सायबर क्राइम पासून वाचू शकू अन्यथा किती नुकसान सहन करावे लागेल हे सांगणे अशक्य म्हणून आपण सारे दक्ष होऊ या असे आवाहन आ. तानाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी केले.
येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुटकुळे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता , माजी आ. गजाननराव घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक कमलेश मीना,राज्य राखीव दलाचे डीवायएसपी आर. बी. बामणवार, पोलिस उपाधिक्षक दत्ता केंद्रे, ज्ञानेश्वर मांमडे, नंदकिशोर तोष्णिवाल, रिझर्व बँक टास्क फोर्स संचालक सुनील देवडा,व्यापारी संघ कार्याध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, पीपल्स बँकेचे अध्यक्ष प्रकाश सोनी,काँग्रेसचे सुरेशआप्पा सराफ व अनिल नेनवाणी ,पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे एक रोपटे व स्मृती चिन्ह देवून सत्कार केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी दृक श्राव्य माध्यमा सह मनोगतातून सायबर क्राईम आणि संभाव्य धोके,उपाय आणि दक्षतेबाबत माहिती देऊन नागरिक म्हणून आपणही जबाबदारी स्वीकारल्या शिवाय तरुणोपाय नाही म्हणून आपण साक्षर झालं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगितल. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व वयोगटातील मंडळींनी सायबर क्राइम हा विषय आत्मसात करून आपण व आपल्या समवेत सर्वांचे भले करावे त्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगून दक्ष व्हा सुरक्षित रहा अस आवाहन करून शासनाच्या मी दक्ष अभियानाच कौतुक केलं.मुख्य मंत्री सहाय्यता निधी साठी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या अधिकारी आणि कर्मचारीह्यांनी आपला एक दिवसाचा पगार २३ लाख ८१ हजार २२२ चा धनादेश पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी जिल्हाधिकारी गुप्ता यांना सुपूर्द केला.
हिंगोली पोलिस दलातील जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी,राज्य राखीव दलाचे अधिकारी कर्मचारी, व्यापारी,पत्रकार, उद्योजक, बँकिंग क्षेत्रातील मंडळी, पुज्य भंतेजी, अंगणवाडी ताई, शिक्षक पालक विद्यार्थी, महिला युवक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला पोलिसांनी संगीतमय पथनाट्य सादर करून जनजागरण केलं तर दिशा फाउंडेशन च्या मंडळींनी या उपक्रमात कसा सहभाग घ्यावा, यांची माहिती दिली.
त्यानंतर व्यापारी महासंघ, पत्रकार संघ,औद्योगिक संघटना,बँकिंग संघटना, अंगणवाडी ताई, शिक्षक,पालक सामान्य नागरिक,दिशा संस्था,महिला पोलिस दलातील पथनाट्य सादर केलेले कर्मचारी,विविध क्षेत्रातील पदाधिकारी, आदींना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार डॉ विजय निलावार यांनी केले. कार्यक्रमासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख मोहन भोसले, पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे उपनिरीक्षक मोरे आदींनी पुढाकार घेतला.


