चिखली (Buldhana):- गावात शांतता व सुव्यवस्थेसाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला(Police Station) वारंवार चकारा माराव्या लागत होत्या. परंतु आता पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज राहिली नसून दरमहा त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन मानधन जमा होणार असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली आहे.
४८ गावाचा समावेश असून २६ पोलीस पाटील कार्यरत
अंढेरा पोलीस स्टेशनला ४८ गावाचा समावेश असून २६ पोलीस पाटील कार्यरत आहेत. गावात व परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलीस पाटलांची महत्वाची भुमिका आहे. गावातील वाद शक्यतो गावातच मिटविण्यात पोलीस पाटलांचे महत्वपूर्ण योगदान राहते. महसूल व पोलीस प्रशासनातील दुवा म्हणून पोलीस पाटील गावोगावी काम पाहतात त्यामध्ये या अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील २६ गावाच्या पोलीस पटलावर ४८ गावाची जबाबदारी सोपविली आहे. तरी सुध्दा पोलीस पाटलांचे मानधन (Remuneration)नियमित होत नाही . काही वेळा वर्षातून एक किँवा दोनदा तर काही महिने दरमहा मानधन देण्यात आले.
पाठपुरावा करून पोलीस पाटलांच्या मानधनाचा मोठा प्रश्न मार्गी लावला
परंतु आता तीन महिन्या पासून पोलीस पाटलांना मानधन मिळाले नव्हते. त्यामुळे अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पोलीस पाटलांच्या मानधनाचा मोठा प्रश्न मार्गी लावला. आणि आज तीन महिन्याचे मानधन ट्रेझरी (Treasury)कार्यालयांत जमा केले. परंतु आता यापुढे पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी पोलीस स्टेशनला येण्याची गरज राहिली नसून त्यांना आता त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन द्वारे मानधन जमा होणार आहे. अशा या निर्णयमुळे पोलीस पाटलांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वांनी अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार व पोहेकॉ कैलास उगले यांचे आभार मानले.