चिखली (Buldhana) :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये आता एकाच कुंटूबातील दोन पात्र लाभार्थी म्हणजे सासू सुनेलाही सहभागी होवून लाभ घेता येणार आहे त्यामुळे गावपातळीवर ग्रा.प. ऑपरेटर, अंगणवाडी सेविका यांच्या कडे जावून मोफत ३१ ऑगस्टपूर्वी नाव नोंदणी करूण घ्यावी असे आवाहन चिखली तहसिलदार संतोष काकडे यांनी उपस्थितीत सर्व केंद्र संचालकांना आवाहन केले आहे .
सासू व सून या महिलांना योजनेमध्ये नाव नोंदणी करून सहभागी होऊ शकतात
चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जा बाबत तालुक्यांतील सर्व ग्रा. प. केंद्र संचालक यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकी मध्ये तालुक्यांतील सर्व ग्रा.प. केंद्र संचालक उपस्थितीत होते सर्वांना तहसिलदार यांनी सांगीतले की एकाच कुंटूबातील २१ ते ६५ वयोगटातील दोन महिला म्हणजे सासू व सून या महिलांना योजनेमध्ये नाव नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. या योजनेमध्ये जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांना नाव नोंदणीद्वारे सहभागी करून घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, आशा, अंगणवाडी सेविका शिक्षक यांची “ग्रामस्थरिय समिती “स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महिलांनी मोफत अर्ज भरून घ्यावे आणि संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांनी अर्ज पडताळणी करून सक्षम अधिका-याकडे मान्यतेसाठी सादर करायचे आहेत. वरील सर्वांनी आपल्या गावातील सर्व पात्र महिलांचे सर्वेक्षण करून ऑफलाइन अर्ज एकत्रित करून घ्यायचे आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी पोर्टलची सुविधा ॲपच्या माध्यमातून ओटीपीद्वारे ही नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील कार्यरत असलेले ग्रा.प. सचिव, ऑपरेटर, अंगणवाडी या सर्वांनी ऑफलाइन फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे.
योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणेच नाव नोंदणी करणे आवश्यक
या योजनेच्या लाभासाठी आधार (Adhar Card)प्रमाणेच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आधारला लिंक असलेले बँक खात्यावरच(Bank account) योजनेची रक्कम थेट जमा होणार आहे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. ही माहिती अचूकच भरावी. ही अचूक माहिती फॉर्ममध्ये भरल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभापासून कोणीही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही. याची काळजी घ्यावी .या योजनेच्या शासन निर्णयामध्ये आता दुरुस्ती करण्यात आली असून योजनेचे लाभार्थी हे राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित(Married), घटस्फोटीत(divorced), विधवा(Widow), परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ दोन महिला लाभार्थी असेल. त्यासाठी पात्र लाभार्थ्याला या योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र आता प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट
परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर, अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा अडीच लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार वीर, खाडे , महिला बाल कल्याण अधिकारी वाघ, गटविकास अधिकारी मोहर, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका ,तथा ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतीचे ऑपरेटर मोठया संख्येने उपस्थित होते .