चिखली (Buldhana):- वाहन चालकांकडून सतत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. यामुळे अपघातांच्या (Accidents) घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी तसेच चोऱ्या व गैरप्रकार रोखण्यासाठी अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी ग्रा.प. च्या मदतीने स्पेशल वॉच(Watch) ठेवत हायवे रोडवरील मेरा खुर्द येथील चौफुलीवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
हायवे रोडवरील मेरा खुर्द चौफुलीवर बसविले सीसीटिव्ही कॅमेरे
खामगाव ते जालना हा हायवे महामार्ग अंढेरा पोलीस स्टेशन (Police Station) हद्दीतून गेलेला आहे. या हायवे रोडवर असलेल्या सरंबा फाटा ते मलगी या गावापर्यंत हायवे रोडच्या दोन्ही बाजूला सरकारी घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक वेळा लांबपंल्याच्या वाहन चालकांनी अनेक मृतदेह आणून टाकतात तर इकडेही अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मेरा खुर्द चौफुलीवरील रात्रदिवस बाहेर गावी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या फाट्यावर लहान मोठी प्रवाशी वाहने चालक आपली वाहने वाटेल त्या ठिकाणी रोडवरच उभे करतात. याच फाट्यावर शाळा कॉलेज, विविध लहान मोठी दुकाने असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या चौफुलीवर गतिरोधक नसल्याने हायवे रोड वरुण ये जा करणारे लहान मोठी वाहने भरधाव वेगात धावतात त्यामध्ये काही वेळा अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते.
सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवली जाणार
त्यामुळे अशा घटणावर आळा घालण्यासाठी अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी स्व:खर्चातून तसेच ग्रा.प. च्या सहकार्याने मेरा खुर्द चौफुलीवर सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV cameras)बसवून सामिजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे आता बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवली जाणार आहे. ठाणेदाराकडून बेशिस्त वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या की नियम मोडणाऱ्यांना थेट कार्यवाहीला सामोरे जावे लागेल. सीसीटिव्ही फुटेज मध्ये ४० फूट अंतरापर्यत घडलेली घटना कैद होईल. त्यामुळे ‘ट्रीपल सीट वाहन (Triple seat vehicle) चालवू नका’, ‘हेल्मेट वापरा’, ‘विरुद्ध दिशेने येऊ नका’चोरी करणाऱ्याची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या सूचना ठाणेदार विकास पाटील यांनी दिल्या आहेत .
यावेळी ठाणेदार विकास पाटील, बिट जमादार कैलास उगले, गोरख राठोड, आंधळे, सोनकांबळे, देढे, वाघ, खारडे, जाधव, सरपंच रमेश अवचार, शिवसेना नेते बाळू वराडे, पोलीस पाटील ठाकूर, उपसरपंच तथा सर्व सदस्य , तंटामुक्त अध्यक्ष गवई, शाळा अध्यक्ष सर्जेराव गवई, आदींची उपस्थिती होती .