कोरची(Gadchiroli):- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायत मधील १०५० तर नगरपंचायत मधील ७१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरातील प्रत्येक घरकुल लाभार्थीला २६९ स्क्वेअर फुटमध्ये स्लॅब इमारत यासह शौचालय (Toilet) बांधकाम करणे आहे. यासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी वाटप केली जात आहे. तर नगरपंचायतमधील लाभार्थींना ३३० स्क्वेअर फुटमध्ये स्लॅब इमारत यासह सौचालय बांधकाम २ लाख ५० हजार रुपयांत करणे आहे. परंतु महागाईमुळे दीड व अडीच लाखाच्या निधीमध्ये साहेब स्लॅबच घर बांधून होईल काय? असा प्रश्न घरकुल धारकांनी उपस्थित केला आहे.
महागाईमुळे घरकुल बांधकामाचा खर्च वाढला, अनेक लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत
दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे स्लॅबच्या इमारत बांधकामातील, रेती, गिट्टी, सिमेंट, सलाख, वीट अशा वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तर सध्या कोरची तालुकामध्ये महसूल विभागाच्या (Department of Revenue) नियोजनात रेती घाट नाही जिल्हा शासनाच्या वतीने प्रत्येक घरकुल धारकाला पाच ब्रास रेती मोफत दिले जात आहे. परंतु एवढ्याच रेतीत फक्त ज्योता पर्यंतच बांधकाम होत आहे. पर्यायी कुरखेडा तालुक्यातील रेती घाटातील रेती वाहतुक खर्च अधिक असल्याने महागाची रेती धारकांना पडते त्यामुळे तालुक्यातीलच छोट्या नाल्यांमधील रेती उपसा करून काही ट्रॅक्टर चालक लाभार्थीला व सर्वसामान्य नागरिकांना रेती पुरवतात परंतु महसूल विभागाकडून अशा ट्रॅक्टर मालकांवर प्रत्येकी १ लाख १८ हजार रुपयांचे दंड ठोठावणे सुरू असल्यामुळे धारकांना रेतीच मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम अर्धवट झाले आहे. तर दुसरीकडे अनेक घरकुल लाभार्थीला मागील एका वर्षांपासून केंद्र सरकारचा दुसरा हप्ताच मिळालेला नाही त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.
ग्रामपंचायत व नगरपंचायत अंतर्गत घरकुल धारक व अनुदान
तालुक्यातील २९ ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर १०५० लाभार्थी आहेत. त्यापैकी ५७७ घरकुलधारकांना पहिला हप्ता मिळाला असून दुसऱ्या हप्तेच्या प्रतीक्षेत आहेत. तर सध्या नगरपंचायत अंतर्गत ७१ लाभार्थी असून १५ लाभार्थीचे गजारकुल बांधकाम पूर्ण झाले असून ५६ लाभार्थी केंद्र सरकारच्या दुसऱ्या हप्तेच्या प्रतीक्षेत आहेत. यातील राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना एक लाख रुपये निधी वाटप करण्यात आले आहे.
काय म्हणतात घरकुल लाभार्थी
१) मला शेवटचा हप्ता २० हजार रुपयांचा चेक मिळाला नाही. माझे घरकुलचे बांधकाम अपूर्णच आहे पैसे केव्हा मिळतील याची वाट बघत आहे.
जैनकुमारी चंद्रकिशन बागडेरिया
घरकुल लाभार्थी रा. कोचीनारा.
२) घराच बांधकाम मी पूर्ण केला आहे परंतु त्यापूर्वी नगरपंचायतचे चक्रा मारू-मारू कंटाळली. दोन चेक ९० हजारांचे मिळणे बाकी आहे.
अहिल्याबाई लव सांडील
घरकुल लाभार्थी कोरची.
अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
शासनाने पीएम आवास योजनेतून लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे या अनुदानामध्ये स्वतःही पैसे खर्च करून घर बांधणे आहे शंभर टक्के पूर्ण घर बांधण्यास अनुदान शासन देत नाही. केंद्र शासनाकडील निधी अजूनही आलेला नाही त्यामुळे घरकुल धारकांचे हप्ते बाकी आहेत.