एनपीडीपी संस्थेचा उपक्रम सोहळा
परभणी (NPDP organization) : एआरटी औषध प्रणाली शासकीय स्तरावर उपलब्ध होऊन २० वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने एचआयव्ही ग्रस्तांना प्रशासकीय स्तरावरील योजना एका छताखाली आणून लाभ देण्यासाठी तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर (RDC Mahesh Vadakar) यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे जवळपास ३ हजारावर लाभार्थ्यांना फायदा मिळाला आहे. गरजूच्या जीवनात आशेचा किरण पेरणारे तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर (RDC Mahesh Vadakar) यांचा विशेष गौरव सोहळा शनिवार ६ जुलै रोजी हॉटेल विसावा कॅफे पार्क येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एनपीडीपी संस्थेच्या अध्यक्षा बबिता चारण यांनी दिली. परभणी शहरातील (NPDP organization) एनपीडीपी ही संस्था एचआयव्ही बाधितांसाठी काम करते. एआरटी औषध प्रणाली आल्यापासून बाधित रुग्णांना दिलासा मिळाला असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे.
मात्र जिल्ह्यात या संदर्भात फारशी जनजागृती नसताना तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जास्तीत जास्त गरजूना प्रशासकीय स्तरावरुन सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अडचणींची सोडवणूक करण्यासाठी विशेष मोहिम राबवली. त्यातून सन २०२२ मध्ये तीन हजारावर लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला. आज त्यांचे जीवनमान उंचावले असून त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण झाली आहे.
एआरटी औषध प्रणालीला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल (NPDP organization) एनपीडीपी संस्थेच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा शनिवार ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सिंहाचा वाटा उचलणारे नांदेड येथील निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर (RDC Mahesh Vadakar) यांचा गौरव करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार्या या विशेष गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन एनपीडीपी संस्थेच्या अध्यक्षा बबिता चारण यांनी केले आहे.