सलग दुसऱ्या वर्षी एनएसयुआय व युवक कॅांग्रेसच्या धडाकेबाज आंदोलनाला यश
अमरावती (Youth Congress) : शहर एनएसयुआय व युवक कॅांग्रेसच्या वतीने नवीन शैक्षणिक प्रणाली (NEP) लागू करतांना जुन्या प्रणालीतील विद्यार्र्थ्यांबाबत पुरेशी उपाययोजना न केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाच्या विरोधात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू साहेबांसोबत सविस्तार चर्चा करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याबाबत इशारा देण्यात आला होता. दहा दिवसात विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय न लागल्यास अमरावती शहर एनएसयूआय व (Youth Congress) युवक कॅांग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
यासंदर्भातील निवेदन सादर करून वारंवार या मागणीचा पाठपुरावा केला गेल्याने आज दि. ०३ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आलेल्या ॲकेडेमिक काउंसिलच्या बैठकीत यावर चर्चा घडून आली. अखेर विद्यार्थी हिताची ही मागणी मान्य करण्यात येऊन मा. कुलगुरुंनी कॅरी ॲानची घोषणा केली. मागील वर्षीसुद्धा शैक्षणिक प्रणालीत बदल करण्यात आल्याने युवक कॅांग्रेस व एनएसयुआयच्या वतीने सलग तीन दिवस धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते व कॅरी ॲानची मागणी मंजूर करून घेण्यात आली होती. सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताकरिता युवक कॅांग्रेस (Youth Congress) व एनएसयुआय कडून पुकारण्यात आलेल्या कॅरी ॲानच्या आंदोलनाला यश लाभले असून ही अमरावती शहर एनएसयुआय व युवक कॅांग्रेसकरिता अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.
कॅरी ॲानच्या या घोषणेनंतर सर्व युवक कॅांग्रेस (Youth Congress) व एनएसयुआय पदाधिकाऱ्यांनी कॅांग्रेस भवन येथे जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा औद्योगिक सेलचे अध्यक्ष समीर जवंजळ,अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, अमरावती शहर एन एस यू आय अध्यक्ष संकेत साहू, यांच्या नेतृत्वात निवेदन घेण्यात आले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष आकाश धुराटकर, यु. काँ. सचिव बांबल, विद्यापीठ स्पोर्ट सेल अध्यक्ष कुणाल जोत, सचिव वेदांत केने , सचिव श्रेयस धर्माळे , उपाध्यक्ष N.S.U.I ओम कुबडे , सचिव मोहित भेंडे, सचिव नितीन ठाकरे, अभिषेक भोसले, साहिल वांद्रे, निशांत पवार, रोशन पवार, क्रिश बीसणे, अमित भोसले, सोहम साबळे, अभिषेक टाले, प्रणव हरमकर, यश तायडे, हिमांशू ढोणे, उपस्थित होते