निलंगा (Latur):- निलंगा विधानसभा मतदार संघाचे (Assembly constituencies) आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी नाभिक समाजाची घोर फसवणूक केल्याचा आरोप ओबीसी बचाव आंदोलनाचे नेते डॉ. हिरालाल निंबाळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात केला आहे.
डॉ.हिरालाल निंबाळकर यांचा आरोप
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात पुढे असे नमूद करण्यात आले की, नाभिक समाजाची मते घेण्यासाठी तालुक्याचे आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी सामाजाच्या नेत्यांच्या कोपराला गूळ लावत असतात. गेल्या जिवाजी महाले जयंती दिनी डॉ. देशमुख यांनी आमदार निलंगेकर यांच्या वतीने समाजाला शब्द दिला होता की, चार महिन्यात समाजाच्या सर्व समस्या मार्गी लावू. परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी निलंगा शहराच्या विविध विकासकामाच्या नावे लाखो रुपयांच्या निधीचे एक पत्र समाज माध्यमावर फिरत असून सदरील पत्रात समाजाच्या समस्यांसाठी कोठेही तरतूद केलेली दिसून आलेली नाही. त्यावेळच्या कार्यक्रमात वंचित बहुजन महिला आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्षा सौ. मंजु निंबाळकर यांनी यांनी ठामपणे सांगितले होते की, नाभिक समाज यापुढे तुमच्या नादी लागणार नाही. आम्ही आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम आहोत. आता समाजाने अशा आमदार व त्यांच्या चेल्या चपाटाच्या नादी लागु नये.
समाजाची गरज म्हणून मी माझा एक भूखंड समाज्याच्या ताब्यात देण्यास तयार आहे, असेही निंबाळकरांनी पत्रकात म्हटले आहे. अशा फसव्या आमदाराचा व त्याचा चेल्या-चपाट्याचा जाहीर निषेध करीत असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.