१३ ऑगस्टला पदोन्नती प्रकिया करण्याचे लेखी आश्वासन
हिंगोली (Nurses Association) : जिल्हा परिषद परिचारिकाची पदोन्नतीचे प्रस्ताव रखडल्याने परिचारिका संघटनेने २९ जुलै रोजी निवेदन देऊन १४ ऑगस्ट पर्यंत पदोन्नतीचा निर्णय न घेतल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा (Health Department) आरोग्य विभागाकडे देताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे, आता १३ ऑगस्टला पदोन्नती प्रक्रिया राबविणार असल्याचे लेखी आशवासनानंतर (Nurses Association) नर्सेस संघटनेने आपले कामबंद आंदोलन मागे घेतले.
येथील जिल्हा परिषदेच्या नर्सेस संघटनेने (Nurses Association) मागील तीन वर्षांपासून आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका यांना पदोन्नती द्यावी यासह अनेक मागन्यासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील टाळाटाळ केली जात होती. आरोग्य सेवक, सेविका यांचे १०,२०, ३०चे कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव धूळखात पडले होते. ते प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य परिचारिका संघटने येत्या १४ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला होता.
त्यानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ अनुप शेंगुलवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . कैलास शेळके यांना बोलावून तातडीने पदोन्नती करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यानी आरोग्य सेवक, सेविका यांच्या पदोन्नती करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याने आरोग्य कर्मचार्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद (Nurses Association) नर्सेस संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
यदाकदाचित तेरा ऑगस्टला पदोन्नती प्रक्रिया न राबविल्यास पुन्हा (Nurses Association) नर्सेस संघटनेकडून जिल्हाभरात कामबंद आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष ज्योती बांगर यांनी दिला आहे. एकंदरित नर्सेस संघटनेच्या आंदोलनाचा धसका आरोग्य विभागाने घेतला आहे.यावेळी (Nurses Association) नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष ज्योती बांगर दहिफळे, कीर्ती सिताबराव, शोभा शिंदे, रत्नमाला मुरमाडकर , मुक्ता मुंढे, सुजाता मठपती, दयासागर कांबळे, वर्षा बोलेवार, पूनम चाटसे, सिंधू आडे, मिरा चीलकेवार, अंकिता सनाळे, जयश्री दिपके आदींची उपस्थिती होती.