कळमनुरी/ हिंगोली (OBC Andolan) : महाराष्ट्रातील ६० टक्के ओबीसींच्या शैक्षणिक-नौकरी-राजकीय २७ टक्के आरक्षणाचे रक्षण होण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने असंवैधानिक रित्या काढलेली सगेसोयरे अधिसूचना आणि बोगस ५४ लाख नोंदी रद्द करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री ता.अंबड जि.जालना येथे प्राण जाई पर्यंत उपोषण मागील ५ दिवसांपासून चालू केले आहे. प्रा.लक्ष्मण हाके यांनी अन्न,पाणी व औषधोपचार सर्व बंद केले आहे.
सगे सोयरे अधिसूचना रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर (OBC Andolan) ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांचे प्राण सुध्दा जाऊ शकतात यामुळे सरकारने ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात , ओबीसी-एससी-एसटी विरूध्द काढलेली सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीने शिफारस केलेल्या बोगस ५४ लाख नोंदी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी ओबीसी जनमोर्चा जि. हिंगोली च्यावतीने १९ जून बुधवार रोजी सकाळी ११.३० वा. उपविभागीय कार्यालय, कळमनुरी येथे आंदोलन (OBC Andolan) करण्यात येणार आहे.
कळमनुरी तालुक्यातील सर्व (OBC Andolan) ओबीसी समाजाने आंदोलनात सामील व्हावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष अॅड.रवि शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव गाभणे, सचिव उमेश गोरे, प्रा.गजानन थोरात आसोलेकर, अशोकराव करे, अतुल बुर्से, कानबाराव शिंदे पुयनेकर, शरद सुरूसे, सतीश लकडे, प्रदीप नाईक चिंचोर्डीकर, राजू बाभळे, पुंजाराव वाघमारे, गणपत सातव, गजानन शिंदे पुयनेकर, प्रा. तुकाराम भूतनर, दत्ता तास्के, विलास लकडे, तुकाराम बाभळे, यशवंतराव मोडक, भास्कर ढाले, प्रशांत सातव, कैलास शिंदे, साहेबराव मेटकर, तुकाराम कवाने, बाळू भूतनर, राजू भूतनर, आबासाहेब हाके,गणेश मुलगीर,अशोकराव मस्के, संतोष ढाले, ओमकेश वैद्य, विलास दिंडे, रमेश राऊत, दिपक डूरके, प्रफुल्ल पाईकराव, लक्ष्मण पोटे, चांदराव बोडखे, बालाजी लोढे, शाहाजी मात्रे, शिवराज मात्रे, अरविंद मात्रे, सचिन हाके, किसन हाके, दत्ता गोरे,सुहास नाईक,शुभम सापनार,अरविंद नाईक यांच्यासह ओबीसी जनमोर्चा जि. हिंगोली चे पदाधिकारी यांनी केले आहे.