कळमनुरी/हिंगोली (Prakash Ambedkar) :ओबीसी समाजाला त्यांची राजकीय झाली तरआगामी विधानसभा निवडणुकीत (OBC community) ओबीसीचे किमान १०० आमदार निवडुन येऊ शकते असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कळमनुरी जाहीर सभेत केले.
वंचित बहुजन आघडीच्या वतीने काढण्यात आलेली आरक्षण बचाव यात्रा कळमनुरी येथे दि.३ ऑगस्ट रोजी आल्यानंतर तोष्णीवाल मंगल कार्यालयात अँड.प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली यावेळी सभेला संबोधित करीत असताना अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, ओबीसी प्रवर्गात २७२ समुहांचा समावेश असुन आत सर्व ओबीसी एकत्र आले असुन प्रत्येक मतदार संघात ओबीसी मतदारांची संख्या ही लाख सव्वालाखाच्या वर आहे. सध्या पावसाळा सुरू असून येत्या ऑक्टोंबर मध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत या निवडणुकीत किमान १०० आमदार ओबीसी प्रवर्गाचे निवडून आणायचे आहेत त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले की, सर्व ओबीसी समाजाला त्यांची राजकीय जाणीव झाली पाहिजे सर्व ओबीसींनी एकीची वजन बांधून सामाजिक व राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणाला (OBC community) विधानसभेनंतर धोका निर्माण होणार असून विधानसभा निवडणुकीनंतर जातनिहाय जनगणना केल्या जाईल यात जात जनगणनेची आकडेवारी होत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळेल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वाद गंभीर होऊन समाजात तेढ निर्माण होऊ नये राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर सर्व २७२ ओबीसींच्या जातींनी एकत्र येणे गरजेचे आहे यामुळे आपली ताकद दाखवा त्याचबरोबर एससी,एसटी, मुस्लिम,आदिवासी,ओबीसी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे या सर्व समाजांनी आपली ताकद दाखवून द्यावी सध्या राजकीय वातावरण बिघडविण्याची भाषा होत असताना दिसून येत आहे ओबीसींच्या ११च आमदार आहे.
यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (OBC community) ओबीसी प्रवर्गाचे किमान १०० आमदार निवडून आणण्यासाठी ओबीसी समाजाने पुढाकार घ्यावा लोकसभेला मुस्लिमांनी जसे झाडून पुसून मतदान केले तसे या विधानसभेत ओबीसींनी एकत्र येऊन मतदान करावे आरएसएस वाल्यांना बळी पडू नका आरक्षण शाश्वत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी बांधवांनी एकीची वज्रमुठ बांधावी असे प्रतिपादन अँड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यावेळी केले. यावेळी मंचावर डॉ.बी.डी.चव्हाण, पक्षनिरीक्षक मोहन राठोड जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा प्रभारी नागोराव पांचाळ, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.दिलीप मस्के,वनिता गुंजकर,तालुकाध्यक्ष राजु कांबळे,शहराध्यक्ष शकील पठाण,शेख अफजल,मोबिन चिश्ती, प्रा. सुरेश शेळके, सय्यद शहेबाज आदींची उपस्थिती होती. ही सभा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
७ ऑगस्ट रोजी मंडळ आयोग दिन साजरा करणार
आरक्षण बचाव रॅली चा समारोप दि. ७ ऑगस्ट औरंगाबाद येथे होणार असुन यादिवशी मंडल आयोग दिन साजरा करण्यात येणार असुन ७ ऑगस्ट रोजी एकत्र येऊन ओबीसी एकत्र आल्याची जाणीव करून द्यायची असल्याचे अँड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.