वसमत येथे आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त सवाल
वसमत/हिंगोली (OBC reservation) : आरक्षणाच्या मागणीवरून समाजात दोन गट पडलेत द्वेष वाढत आहे जरांगे यांच्या मागणीवर राजकीय पक्ष स्पष्ट मत व्यक्त करत नाहीत तर उलट समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे भडकावू वक्तव्य करत आहेत महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे मत व्यक्त करत आहेत महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे तुम्ही म्हणता म्हणजे काय तुम्हाला मराठा व ओबीसींना एकमेकांची घरे जाळायला लावायची आहेत काय असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) वसमत येथे आरक्षण बचाव यात्रेत केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण बचाव यात्रा ३ ऑगस्ट रोजी वसमत येथे पोहोचली वसमत येथे आरक्षण बचाव यात्रेचे व ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रूपांतर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे वेडेवाकडे बोलून समाजाला भडकवण्याचे प्रयत्न होतील काहीतरी करायला तयार व्हा, असे करा तसे करा, त्याच्या विरोधात आंदोलन करा असे आवाहन करून भडकावले जाईल, हे भडकावणारे मात्र स्वतःच्या कुटुंबातील सदस्य मुलगा यांना आंदोलनात पाठवणार नाहीत त्यांना अडकवणार नाहीत तर ते तुम्हाला अडकवतील त्यामुळे तुम्हीही सावध राहा, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून गरीब मराठासमाज (OBC reservation) दोन्ही बाजूने फसवला जात असल्याचे त्यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीनंतर आरक्षणाला धोका होणार आहे कायमचा काटा काढला जाईल श्रीमंत मराठे एक तीर से दो निशान करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सात ऑगस्टला आरक्षण बचाव यात्रेचा समारोप होणार आहे या समारोपीय कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त वसमत येथे आयोजित सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.