हिंगोली (OBC reservation) : महाराष्ट्रातील ६०% ओबीसींच्या (OBC reservation) शिक्षण-नौकरी-राजकीय २७% आरक्षणाचे स्वसंरक्षण होण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने असंवैधानिक रित्या काढलेली सगेसोयरे अधिसूचना आणि बोगस ५४ लाख नोंदी रद्द करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य ओबीसी संघर्ष योध्दे प्रा.लक्ष्मण हाके सर यांनी वडीगोद्री ता.अंबड जि.जालना येथे प्राणांतिक उपोषण (प्राण जाई पर्यंत उपोषण) ७ दिवसांपासून चालू केले आहे. प्रा.लक्ष्मण हाके सर (Prof. Laxman Hake) यांनी अन्न,पाणी व औषधोपचार सर्व त्यागले आहे यामुळे प्रा.लक्ष्मण हाके सर यांचे प्राण सुध्दा जाऊ शकतात.
१९ जून बुधवार रोजी वडीगोद्रीला रवाना
आंदोलनाला (OBC Andolan) पाठिंबा देण्यासाठी आज दि.१९ जून २०२४ बुधवार रोजी वडीगोद्री ता.अंबड येथे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली,औंढा,सेनगांव, वसमत येथील हजारो ओबीसी बांधव गाड्या घेऊन प्रा.लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झालेत. यामध्ये ओबीसी नेते राजेंद्र शिखरे, चंदू लव्हाळे ,ॲड.रवि शिंदे,ॲड.संतोष राठोड,केशवराव नाईक,विठ्ठलराव गाभणे,बंटी नाईक ,सतीश लकडे,दिपक कापसे, सुरेंद्र ढाले,किसनबापू कोकरे,लखन शिंदे,प्रदीप नाईक,केशवराव मस्के ,मधुकर घुगे,बाजीराव घुगे,साहेबराव मेटकर,कुबेर गोरे,साहेबराव देशमुख,राजू बाभळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव रवाना झालेत.