प्रा. लक्ष्मण हाके यांचा इशारा
परभणी/गंगाखेड (OBC Samaj) : बोगस नोंदी तात्काळ रद्द झाल्या पाहिजे अशी शासनाला कळकळीची विनंती असल्याचे सांगत सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला तर महाराष्ट्र राज्यातला (OBC Samaj) ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके (Prof. Laxman Hake) यांनी गंगाखेड येथे परळी नाका परिसरात आज ओबीसी बंधवांशी संवाद साधतांना दिला
ओबीसी समाज (OBC Samaj) बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषण केल्यानंतर ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अभिवादन दौऱ्यानिमित्त गंगाखेड मार्गे परळीकडे जात असताना गंगाखेड तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांकडून या अभिवादन दौरा यात्रेचे परळी नाका येथे भव्य स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, (OBC reservation) ओबीसीचं आरक्षण अडचणीत नाहीतर दलीत बांधवांचे आरक्षण सुद्धा अडचणीत आहे.
आरक्षण वाचविण्यासाठी दलीत बांधवांनी ही या लढ्यात उतरावे उतरावे असे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. यावेळी (OBC Elgar Parishad) ओबीसी एल्गार परिषदेचे निमंत्रक गोविंद लटपटे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी जि. प. सदस्य भगवान सानप, मनसेचे बालाजी मुंडे, शंकरराव वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, साधना राठोड, वंचित आघाडीचे सुरेशराव फड, प्रा. अमोल ढाकणे, मनोहर व्हावळे, दिगंबर घोबाळे, बालासाहेब यादव, माधव शेंडगे, महादेव फड, प्रा. संजय दराडे, लक्ष्मण लटपटे, मनोज मुरकुटे, राहुल फड, नवनाथ पाळवदे, अशोक मुंडे, नारायण घनवटे, राजाभाऊ पाळवदे, सदाशिव कुंडगीर आदींसह तालुक्यातील सकल (OBC Samaj) ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.