परभणी/ सेलू (Parbhani) :- शनिवारी 29 रोजीचे सकाळी 11.10 वा. चे सुमारास कमलबाई इद्रंजित लोंखडे वय 50 रा.विधा नगर या महिलेने सरकारी कामात अडथळा आणल्या मूळे फिर्यादी महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री नागनाथ पूरी या पोलिस स्टेशन सेलू येथे कर्तव्यावर हजर असताना कथित सामाजिक कार्यकरती आरोपी महिला नामे कमलबाई इंद्रजित लोखंडे अं.वय 50 वर्षे रा. विद्या नगर सेलू हिने पोलिस निरीक्षक कक्षात मृतक (deceased)रमेश माधवराव लोखंडे वय 55 वर्ष रा. ब्राम्हणगाव ता. सेलू याचे मरणाबाबत खबर देण्याचे कारणावरून पोलिस निरीक्षक कक्षात ‘मी एक सामाजिक कार्यकर्ता असून माझे तुम्ही ऐकलेच पाहिजे, मी सांगेल तीच तक्रार घ्या’ तुम्ही मृतकाचे मुलास काहीही विचारू नका अशी दबावाची भाषा बोलुन मो- मोठ्याने गोंधळ करून,अरेरावी करून , पो नि. यांचे अंगावर धावून गेली.
आपण प्रेत इथेच पोलिस स्टेशनला आणून ठेऊ अशी चिथावनी
यातील फिर्यादी हिने त्या महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीस सुध्दा धक्का -बुक्की करून तुला काय करायचे आहे? अश्लिल शिवीगाळ करून तुला पाहून घेईन, मी अनुसुचित जाती -जमातीची आहे, अनुसुचित जाती जमाती कायद्याअंतर्गत तक्रार करण्याची धमकी देवून मृतकाच्या मुलाला स्वप्निल कांबळे यास तु आता तक्रार देवु नको आपण प्रेत इथेच पोलिस स्टेशनला (police station)आणून ठेऊ अशी चिथावनी(Provocation) देवुन त्याला सोबत घेवून जावून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून पो.नि.दिपक बोरसे यांचे आदेश्याने पुढील तपास कामी पो.उप.नि.श्री सावंत यांच्या कडे देण्यात आला.