Odisha BJP Cabinet : ओडिशाला 24 वर्षांनंतर आज नवीन मुख्यमंत्री (Odisha CM) मिळणार आहे. त्यामुळे अधिक काळ सत्तेत असलेली (BJD Govt) बीजदची सत्ताही संपुष्टात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी झाला आहे. भाजपचे नेते, चार वेळा आमदार आणि प्रमुख आदिवासी नेते मोहन चरण मांझी आता मुख्यमंत्रीपद भूषवणार आहेत. (Odisha BJP Cabinet) यासोबतच पक्षाने केव्ही सिंग देव आणि प्रवती परिदा यांना उपमुख्यमंत्री बनवले असून, आज संध्याकाळी अनेक मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत.
मांझी सरकारमध्ये कोणत्या मंत्र्यांचा समावेश?
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी डझनहून अधिक ज्येष्ठ आणि (BJP Cabinet) युवा भाजप आमदारांच्या नावांची मंत्री म्हणून चर्चा सुरू आहे. यामध्ये जयनारायण मिश्रा, सुरेश पुजारी, रविनारायण नाईक, लक्ष्मण बाग, सूरमा पाधी आणि भास्कर मधे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात (Odisha BJP Cabinet) समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्ष्मण बाग वगळता इतर सर्व नेते किमान दोनदा विधानसभेवर निवडून आले आहेत. लक्ष्मण बाग यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी कांताबंजी विधानसभा मतदारसंघातून BJD अध्यक्ष आणि निवर्तमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पराभव केला होता.
माहितीनुसार, बाबू सिंग, इरेसिस आचार्य, संजली मुर्मू, शत्रुघ्न जेना, नवीन कुमार जैन, सरोज कुमार प्रधान, दुर्गा प्रासन नायक, प्रद्युम्न कुमार नायक, प्रदीप बाल सामंत (सुकिंदा), मुकेश महालिंग, नित्यानंद गोंड आणि सूर्यवंशी यांच्यासह इतर नावे आहेत. छत्तीसगडचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांचे पुत्र पृथ्वीराज हरिचंदन यांचाही (odisha Cabinet) ओडिशाच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. माहितीनुसार, (Odisha BJP Cabinet) ओडिशा विधानसभेत मुख्यमंत्र्यांसह 22 मंत्री परिषद सदस्य आहेत. ओडिशात नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल (BJD) ची 24 वर्षांची सत्ता भाजपने संपवली. एकूण 147 जागांपैकी भाजपने 78 जागा जिंकल्या. BJDला 51 जागा मिळाल्या, जे बहुमताच्या 74 च्या खूप मागे होते आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या.