Washim:- मानोरा येथील तहसील कार्यालयात दलालाचा सुळसुळाट झाला असून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना व महिलांना कामे करून देतो म्हणून त्यांचे आर्थिक लूट सुरू आहे. अशा दलालाची पाय बंद करावी, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
अनेक कागदपत्रे काढून देण्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढ़ला आहे
शासनाकडून सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) नुकतीच सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी महिलेचं नाव राशन कार्ड (Ration card) मध्ये असणे गरजेचे आहे. परंतु अनेक मुलीचे लग्न झाले असून त्यांचे नाव आपल्या वडिलांच्या राशन कार्ड मध्येच आहे. त्यामुळे त्यासाठी अनेक महिला व नागरिक महिलेचे राशन कार्ड मध्ये नाव चढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यासाठी लागणारे विविध कागदपत्र काढून देण्यासाठी तहसील कार्यालयात येतात. शासनाच्या विविध योजनेतील कामे करून देण्याच्या नावाखाली व राशन कार्ड मध्ये नाव चढून देण्यासाठी अनेक महिलेची व सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्र राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला(Proof of income), रहिवाशाचा दाखला, नॉनक्रिमिनल(Noncriminal), ६० वर्ष निराधार श्रावण बाळ योजना असे अनेक कागदपत्रे काढून देण्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयात दलालाची सुळसुळाट वाढ़ला आहे.
शासनाच्या विविध योजना या ऑनलाइन मिळवण्याची प्रक्रिया
या दलालांना अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी (employees) हे मदत करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा लुटीचा धंदा हा बिनबोट सुरू आहे. सध्या शासनाच्या विविध योजना या ऑनलाइन मिळवण्याची प्रक्रियाआहे. पण एजंट हे नागरिकांच्याअज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना कागतपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. तहसील कार्यालयातील(Tehsil Offices) दलालांना रोखण्याची मागणी तालुक्यातील नागरिकाकडून होत आहे.