कारंजा(Washim):- येथील सेवानिवृत्त कर्मचारी भगवान रामकृष्ण पाटील वय 65 वर्ष हे 30 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वाकसाठी घरून गेले तेव्हापासून घरी परतले नव्हते. अखेर शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास नागपूर (Nagpur)संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील सावरकर चौका नजीकच्या विराज घुडे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह (Deadbody)आढळला. कारंजा शहर पोलिसात या संदर्भात हरविल्याची तक्रार (complaint) दाखल करण्यात आली होती.
चार दिवसापासून होते बेपत्ता
भगवान पाटील हे कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथे राहत होते. मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर घरी परतले नव्हते म्हणून कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे व इतरत्र शोधाशोध केली असता ते आढळून आले नाही . त्यामुळे त्यांच्या पत्नीने कारंजा शहर पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर चार दिवसानंतर विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. शहर पोलिसांनी या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.