परभणी (Parbhani):- हत्तीरोग रात्र रक्त नमुने संकलीन ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये हत्तीरोगाचे २२ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
२० वर्षा पुढील कोणत्याही व्यक्तीचे रक्त नमुने गोळा करावेत याबाबत संबधीतांना माहिती द्यावी
हत्तीरोग बाधित नसलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक औषधोपचार मोहिम सन २०२५ मध्ये समाविष्ट करावयाचे ब्लॉक निश्चीत करण्यासाठी ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या दरम्यान रात्र रक्त नमुने संकलन करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. परभणी जिल्ह्यात पाच सेंटीनल साईट व पाच रॅन्डम साईटची (Random site) निवड करण्यात आली. मार्गदर्शक सूचनांचे पालन करत रक्त संकलन मोहिम राबविण्यात आली. निवडलेल्या गावात किमान ३०० रक्त नमुने (Blood Samples) घ्यावेत, २० वर्षा पुढील कोणत्याही व्यक्तीचे रक्त नमुने गोळा करावेत याबाबत संबधीतांना माहिती द्यावी, प्रत्येक साईट साठी एक टिम तयार करुन त्याव्दारे रक्तनमुने संकलीत करावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी आवश्यक कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. हत्तीरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी रक्तनमुने संकलन मोहिम राबविण्यात आली. यानुसार सुक्ष्म कृती नियोजन कार्यक्रम राबविण्यात आला. पूर्णा, परभणी, पालम, गंगाखेड, मानवत, सेलू, जिंतूर, परभणी महापालिका या क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले. ३ हजार रक्त नमुने गोळा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. हाय रिस्क, रॅन्डम साईट अशी विभागणी करुन रक्त नमुने संकलीत करण्यात आले आहेत.