हिंगोली (Hingoli):- राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे रखडलेल्या हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी(Medical Colleges) जनतेने वज्रमूठ आवळली आहे. लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा हिंगोलीकरांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन शुक्रवारी दिला.
पुढील आठवड्यात जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
मागील दोन वर्षापासून मंजूर असलेले हिंगोलीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यंदाही सुरू होऊ शकले नाही. वैद्यकीय प्रवेशाची पहिली फेरी होऊनही हे प्रकरण शासन दरबारी प्रलंबित आहे. स्थानिक प्रशासन व राज्य शासन (State Govt) याकडे लक्ष देत नसल्याची जनभावना हिंगोलीत तयार झाली आहे. हिंगोलीचे वैद्यकीय महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्षातच सुरू व्हावे यासाठी हिंगोलीकरांच्या या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याने हिंगोलीतील पत्रकार(journalist), व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी एक व्यापक बैठक घेतली. हॉटेल गणेश इनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस पत्रकार, व्यापारी, वकील, डॉक्टर आदींसहीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेतून हा विषय जिल्हाधिकार्यां मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवावा असे ठरविण्यात आले.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली
बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व नागरीकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली. भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये इशारा देण्यात आला आहे की, चालू शैक्षणिक वर्षात हिंगोलीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू न झाल्यास जिल्हाभर व्यापक जनआंदोलन केले जाईल. जिल्हाधिकार्यांनी याबाबत शासनाला ताबडतोब कळविण्याचे आश्वासन दिले. या भेटी नंतर जिल्हाधिकार्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जनमाध्यमचे संपादक प्रद्युम्न गिरीकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अधिष्ठात्यांकडून याबाबत तातडीने माहिती घेऊन हिंगोलीकरांच्या जन भावना शासनापर्यंत पोहचवतील. यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, वसंत भट्ट, तुकाराम झाडे ,प प्रद्युम्न गिरीकर, थोरात, प्रशांत बाहेती, सचिन भट्ट, सुधाकर वाढवे, विजय गुंडेकर, राकेश भट्ट, नौमान शेख नईम, रविंद्र वाढे, विशाल इंगोले, विनायकराव देशमुख, एहसानखान पठाण यांची उपस्थिती होती. यावर्षी हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा हिंगोलीकरांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शासनाला कळविण्याचे जिल्हाधिकार्यांचे आश्वासन
नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकूण घेऊन याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडून माहिती घेऊन शासनाकडे आवश्यक त्या कार्यवाहीची शिफारस करण्याचे आश्वासन दिले.