कारंजा (Karanja) :- सामाजिक(Social), सांस्कृतिक (cultural)व क्रीडा क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या येथील लोकमान्य व्यायाम शाळेने १ ऑगस्ट रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने भव्य शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात देखिल करण्यात आली आहे.
लोकमान्य व्यायाम शाळेने १ ऑगस्ट रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण
प्रारंभी येथील सहायक निरीक्षक प्रशांत सुपनावळ यांचे हस्ते ध्वजारोहन (hoisting the flag) करण्यात आले. तर व्यायामशाळेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत घुडे व गो ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पद्माकर मिसाळ यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. तर लक्ष्मीकांत घुडे, भीमराव गागरे, गोपाळराव वाघाडे, प्रशांत सुपनावळ, डॉ.सुशील देशपांडे, रफ ऍण्ड टफ ग्रुपचे शिवाजी गायकवाड, मुकेश राय, नितीन गढवाले, डॉ.पद्माकर मिसाळ यांच्याहस्ते महोत्सव विजयी ज्योत प्रज्वलित करण्यात आली. व्यायामशाळेचे सचिव गोपाळराव वाघाडे यांनी शंभर वर्षातील व्यायाम शाळेच्या वैभवशाली परंपरेची वाटचाल मनोगतातून विशद केली. या कार्यकाळात व्यायाम शाळेचे(Exercise school) जे पदाधिकारी व सदस्य दिवंगत झाले, त्या सर्वांना याप्रसंगी श्रद्धांजली (Tribute)वाहण्यात आली. त्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. बँड पथकाच्या गजरात काढलेल्या या भव्य रॅलीचे चौका चौकात लोकांनी स्वागत केले . या रॅलीत व्यायाम शाळेचे सर्व सदस्य, डॉक्टर असोसिएशनचे डॉ .अजय कांत, डॉ. राम गुंजाटे, गो ग्रीन , गुड मॉर्निंग ग्रुप, रफ अँड टफ ग्रुप, लोकमान्य भजनी मंडळ आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे संचालन आनंद पेंटे यांनी केले.