पुसद (Pusad):- गेल्या अनेक दिवसांपासून शहरांमध्ये मोठ्या व्यवसाय किरकोळ व्यवसायिकांकडून प्लास्टिक पन्नी (plastic foil) चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या पण या सहजासहजी नष्ट होत नाहीत. त्या उकिरड्यावर व्यापारी ठिकठिकाणी शहरांमध्ये टाकत असल्यामुळे प्रदूषणासह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
तब्बल दहा क्विंटल प्लास्टिक पण या जप्त, तर हजारो रुपयांचा दंड वसूल
मोकाट जनावरे उकिरड्यावर अन्नाच्या शोधार्थ फिरत असताना या पण्या सेवन करीत असत त्यामुळे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या पण्या यांमुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. “दैनिक देशोन्नती ” या संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे (Department of Health) लक्ष वेधले होते. याची गंभीर दखल घेत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांनी पुसद आरोग्य विभागाच्या आरोग्य निरीक्षक कु. जायली नकवाल तथा दर्पण राठोड, पाटील, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख किरण आत्राम यांच्यासह इत्यादी अधिकाऱ्यांनी सदरची कारवाई केली.
विशेष म्हणजे या कारवाईमध्ये सातत्य राहणं गरजेचं आहे. केवळ एक दिवस कारवाई (action) करून जर हे पथक थांबत असेल तर हे धोकादायक आहे हे विशेष.