खापरखेडा(Nagpur) :- गोरोबा मैदान धावडे मोहल्ला नागपूर येथे संपन्न झालेल्या खासदार क्रीडा महोत्सव २०२५ (Khasdar Krida Mohotsav 2025) रस्सीखेच स्पर्धेत शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा येथील खेळाडूंनी प्रशिक्षक अर्पिता जालंदर व पियुष भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम स्थान प्राप्त केले
महाराष्ट्र विद्यालयाचा २-० गुणांच्या फरकाने दणदणीत विजय
१८ वर्ष वयोगटातील मुलींनी ४०० किलो आत वजनगटात साखळी सामन्यात सेंट उर्सूला गर्ल्स स्कूल नागपूर संघावर २-०, उपांत्य फेरीत बी.के. सी.पी. कन्हान संघाला २-० ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला व अंतिम सामन्यात महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा या संघावर २-० गुणांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामूळे खापरखेडा परिसरात एकच जल्लोष बघायला मिळाला याप्रसंगी महाविद्यालय, मुख्य बाजारपेठ, आण्णामोड परिसरात भव्य रॅली काढण्यात आली यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर नाचत गाजत जल्लोष साजरा केला शिवाय जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
फटाक्यांची जोरदार आतिषबाजी
रस्सीखेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सानिया प्रेम भलावी धनश्री रुपराव कांबळे, अंकिता नरेंद्र धुर्वे, ऐन्जल विजय गौर, शिवानी रामभाऊ माहुरे, सारिका आशिक कटेरिया, सुजाता आशिक कटेरीया, प्रशंशा रामसूफल नाविक, आयेशा संजय चव्हाण, आरुषी निषाद यांच्यासह प्रशिक्षक अर्पिता सुनील जालंदर, पियुष भोकरे, व्यवस्थापक पुष्पा बढिये, मनिषा नखाते यांचा मुख्याध्यापक विमलप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका विना पांडे, गणेश चिखले, चंद्रकांत गायकवाड, संगीता ठाकरे, गजानन गायकी, चंद्रकांत मोहोड, नरेंद्र बुटोलिया, प्रमोद इंगळे, नीरज मिश्रा, सुरेखा चिखले, गीता जालंदर, आशा कालसरपे, जिजा जैन, यामिनी घोरमाडे, किशोर बक्सरिया, सुनील जालंदर, अभय मिश्रा भोला बक्सरिया, किशोर निकोसे, विवेक खन्नाडे आदींनी सहकार्य केले