परभणी/दैठणा(Parbhani) :- ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर अपघातग्रस्त(Accident) होते काय या भितीने चालकाने ट्रॅक्टरवरुन उडी मारली. मात्र त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार २२ जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान परभणी – गंगाखेड रोडवरील ताडपांगरी येथील नवीन टोलनाक्याजवळ घडली.
परभणी – गंगाखेड रोडवर ताडपांगरी टोलनाक्या जवळील घटना
मुंजा बोराडे (वय २७ वर्ष, रा. पिंगळी) असे मृतकाचे नाव आहे. मुंजा बोराडे हे एम.एच. २२ – एक्स. १८०१ हा ट्रॅक्टर घेऊन पोखर्णीकडून ताडकळसकडे जात होते. ताडपांगरी नवीन टोल नाक्याजवळ त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. ट्रॅक्टर कुठे तरी जाऊन धडकते काय या भितीने मुंजा बोराडे यांनी ट्रॅक्टरवरुन बाजुला उडी घेतली. मात्र ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच दैठणा पोलिस ठाण्याचे सपोनि. अशोक जायभाये यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथे पाठविला.