परभणी (Parbhani) :- बारावीच्या परीक्षेसाठी जात असलेल्या चुलत भावाला दुचाकीवरुन फाट्यापर्यंत सोडण्यास आलेल्या सोळा वर्षीय युवकाचा अपघाती (Accident) मृत्यू झाला. ही घटना सोमवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. भावाला सोडून दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या युवकाला भरधाव चारचाकी वाहनाने उडविले.
परभणी तालुक्यातील आनंदवाडी पाटीजवळील घटना
या अपघाताविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विकास उत्तम शेळके वय १६ वर्ष रा. आनंदवाडी, असे मृतकाचे नाव आहे. सदर युवक हा चुलत भावाची इयत्ता बारावीची परीक्षा असल्याने त्याला सोडण्यासाठी दुचाकीवरुन आनंदवाडी पाटीजवळ आला होता. यावेळी वाहनाची वाट पाहत दुचाकीसह उभ्या असलेल्या विकास शेळके याला एम.एच. २२ बी.सी. ३४२३ या क्रमांकाच्या चारचाकीने जोराची धडक दिली. जखमी युवकाला रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्याचा मृत्यू (Death) झाला. घटनास्थळी दैठणा पोलीस ठाण्याचे सपोनि. अशोक जायभाय, सपोउपनि. बळीराम मुंढे, पोलीस अंमलदार संजय देवकते, पिंपळपल्ले, विठ्ठल कुकडे यांनी धाव घेतली. मृतक विकास शेळके हा दहावीला होता. त्याच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मृतकाच्या पश्चात आई- वडिल, बहिण, भाऊ असा परिवार दैठणा पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.