दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी
पुसद (Chhatrapati Shivaji Maharaj) : छत्रपती शिवाजी महाराज व्हॉट्सॲप ग्रुप वर शरद चंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे व मनोज जरांगे पाटील या तिघांचा हास्यास्पद फोटो टाकून घरातून रुसून न सांगता निघून गेले आहेत. दिसल्यास समजूत काढून घरी आणून सोडावे, योग्य ते बक्षीस दिले जाईल अशा आशयाचा मजकूर लिहून कोरसाळपणे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावून तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करा या आशयाचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार गजानन कदम तसेच प्रभारी ठाणेदार धीरज बांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे सदर निवेदनावर शिवाजीराव कदम, चक्रधर मुळे, गजानन लकडे, दत्ता कदम, गजानन उबाळे, धीरज पानपट्टे, प्रवीण कदम, वैभव दुधाने, प्रशांत गावंडे, अंकुश जामगडे, सुशील वानखेडे, अभिषेक नादरे, प्रमोद देशमुख, सचिन भिताडे,आकाश साठे, शरद दुधाने इत्यादी मान्यवरांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनात ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप आहे. या ग्रुप मध्ये अशोक बनचरे रा नवीन पुसद मो. नं. 9921371335 वरून सहा डिसेंबरच्या सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज व्हॉट्सॲप ग्रुप वर खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हास्यस्पद फोटो टाकून घरातून रुसून न सांगता निघून गेले आहेत, दिसल्यास समजूत काढून घरी आणून सोडावे, योग्य ते बक्षीस दिले जाईल. अशा आशयाचा मजकूर लिहून खोडसाळपणे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावून तेड निर्माण करणारे कृत्य केले आहे. यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे अशोक बनचरे या दिवशी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.