परभणी (Muslim Samaj) : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या रामगिरी महाराज व यतीनरसिंहानंद सरस्वती तसेच मुस्लीम समाजाला शिवीगाळ करुन मस्जीदीत घुसून जीवे मारण्याच्या धमक्या देवून आतंक, दहशत निर्माण करणार्या नितेश राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कुल जमाती तंजीम जिल्हा परभणीच्या वतीने शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकार्यांमार्फत मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात आले.
दोषींवर युएपीए अंतर्गत कडक कारवाई करावी, नितेश राणे यांना तात्काळ अटक करावी, प्रेषित मोहम्मद व इतर धर्मातील वरिष्ठांवर विटंबना होऊ नये म्हणून कडक कायद्याचे प्रावधान करावे, वक्फ संशोधन बिल परत घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर मुफ्ती आब्बास हुसैनी, मौलाना अब्दुल रहेमान खादरी, गुलाम महोम्मद मिठ्ठू, मोहम्मद गौस झैन, सय्यद कादर, जाकेर खान, नदीम इनामदार, अॅड. आसेफ पटेल, सय्यद इब्राहिम, मुसद्दीक खान, शेख साजिद यांच्यासह मुस्लीम समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहेत. धरणे आंदोलनाला मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.