पुसद (Pusad):- जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे पुसद मध्ये दि. 24 दुपारी 12 वाजता च्या दरम्यान सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेण्याकरिता येथील उपविभागीय कार्यालयाच्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यालयाच्या प्रमुखांसह त्यांनी व्यक्तिशः फेस टू फेस कर्तव्याचा आढावा
त्याकरिता ते सततधार पावसात सुद्धा उपस्थित राहिले. शहरासह तालुक्यातील 27 अत्यंत महत्त्वाच्या विविध कार्यालयाच्या प्रमुखांसह त्यांनी व्यक्तिशः फेस टू फेस कर्तव्याचा आढावा घेतला. तब्बल तीन तासाच्या वर चाललेल्या या आढावा बैठकीमध्ये सर्वच योजनांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था पेंडिंग(pending) असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात गांभीर्याने तपास करून गुन्हे निकाली काढण्याचे आदेश ही त्यांनी सर्व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ठाणेदारांना दिले. तर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कर्तव्यात हयगय नको, आपले कर्तव्य चोख पार पाडा.
आपले कर्तव्य चोख पार पाडा
सर्व योजनांचे यशस्वीपणे राबवून त्या नागरिकांपर्यंत पोहोचवा, हलगर्जीपणा व काम चुकारपणा सहन केल्या जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी यावेळी या बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. हे विशेष या बैठकी करिता उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेवराव जोरवर, निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाची उपअभियंता प्रकाश झळके, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे, सब रजिस्टार खरेदी-विक्री कार्यालय, पुसद सहकारी संस्था निबंधक कार्यालयाचे सुनील भालेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर, ठाणेदार उमेश बेसरकर, देविदास पाटील, ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.