पाथरी तालुक्यातील सारोळा बु. येथील घटना अकस्मात मृत्युची नोंद!
परभणी (Old Woman Death) : परभणीच्या पाथरी तालुक्यातील विहिरीतील पाण्यात बुडून एका साठ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. ही घटना 2 जुलै रोजी सकाळी सात ते साडे अकरा या दरम्यान, तालुक्यातील सारोळा बु. येथे घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सदाशिव बुलंगे यांनी खबर दिली आहे. त्यांची चुलती अरुणाबाई प्रकाश बुलंगे वय 60 वर्ष, या सारोळा बु. शिवारात विहिरीमध्ये पडल्या. पाण्यात बुडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाथरी पोलिसात नोंद करण्यात आली असून, तपास पोह. लटपटे करत आहेत.
विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू!
पाथरी : तालुक्यातील पाथरगव्हाण शिवारात विहिरीच्या पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 2 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. अनिकेत आवचार वय 23 वर्ष, असे मयताचे नाव आहे. अमोल आवचार यांच्या खबरीवरुन पाथरी पोलिसात (Pathari Police) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. थोरे करत आहेत.