बँकेचे ओमभवन व स्व. ओमप्रकाशजी देवडा यांच्या १० पुण्यतिथी निमित्त
हिंगोली (Omprakash Deora Bank) : ३ मार्च रोजी ओमप्रकाशजी देवडा पीपल्स को-ऑप. बैंक लि., हिंगोली बँकेचे मुख्य कार्यालय नवीन इमारत ओमभवन येथे स्व. ओमप्रकाश देवडा यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त ओमप्रकाश देवडा (Omprakash Deora Bank) पीपल्स को-ऑप. बँक हिंगोली व लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व (Cataract surgery) मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले.
याप्रसंगी परिसरातील २२७ मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व ४७ मोतिबिंदू रुग्ण आढळले त्यांना रुग्णवाहीने द्वारे नांदेडला पाठविण्यात आले. त्या रुग्णावर मोतिबिंदु शस्त्रक्रिया (Cataract surgery) आज करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेडचे तज्ञ त्रिमुख क्षिरसागर, रामप्रसाद शिंदे व आशुतोष देशमुख यांनी रुग्णांची तपासणी आधुनिक मशीन द्वारे केली.
या (Omprakash Deora Bank) शिबीराचाचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी, उपाध्यक्ष सुनिल देवडा, डॉ. सचिन बगडीवा, संचालक विठ्ठलदास मुंदडा, शशिकांत दोडल, ज्ञानेश्वर मामडे, संजय देवडा, राजेश अग्रवाल, आशिष काबरा, अग्रवाल महिला मंडळाच्या सौ. अंजु देवडा, सौ. नितू देवडा, सौ. शीला देवडा, कविता अग्रवाल, संगीता कयाल व अन्य सदस्या उपस्थित होत्या.
या (Omprakash Deora Bank) शिबिर समितीचे नंदकिशोर भालेराव, शशिकांत कंदी, आशिष पिंगळकर, संजय बोहरा, दयाल यादव, तसेच अभिषेक राऊत, मोहनिश चव्हाण, सुमित दुबे, ऋषिकेश पांचाळ, रवि गरड, दिपक टारपे, कु. संस्कृति पिंगरर यांनी नियोजन व परिश्रम घेतले.
मंगळवार दि. ४ मार्च रोजी सकाळी १० पासून मोफत कर्करोग तपासणी व उपचार मार्गदर्शन (Cataract surgery) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी आपले नांव नोंदवावे मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे शिबीर समितीचे नंदकिशोर भालेराव, शशिकांत कंदी, आशिष पिंगळकर, संजय बोहरा व दयाल यादव यांनी केले आहे.