परभणी(Parbhani) :- शहरातील कारेगाव रोडवर असलेल्या एका वसतिगृहात (Hostel)नऊ वर्षीय अल्पवयीन मुलावर दुसर्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पिडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीवर २४ सप्टेंबर रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन आरोपीवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल
पिडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ जून २०२४ ते ५ सप्टेंबर या कालावधीत सदर वसतिगृहात आरोपी सोळा वर्षीय मुलाने नऊ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. घडला प्रकार पुढे आल्यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाने आपबिती सांगितल्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोक्सो(POCSO) आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.