पातूर (Akola) :- लहुजी शक्ती सेना पातुर च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे 104 वी जयंती मोठ्या उत्साहात पातुर शहरामध्ये साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान भीम नगर पातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात
यावेळी माजी आमदार बळीराम भाऊ शिरसकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(Nationalist Congress Party) जिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत मोपे वाड, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव वामन भिसे, जगदीश भाऊ भोंगळ, महादेवराव साबळे वासुदेवराव डोलारे, राहुल घनगाव मंगेश दादा गाडगे, सचिन भाऊ सुरवाडे राजूभाऊ उगले, गणेश भाऊ घाडगे, सागर भाऊ रामेकर, विष्णू भाऊ शेलारकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष देवानंद वानखडे निखिल शिंदे गजानन नाव कार श्रीकृष्ण मानकर महादेव घोडे प्रशांत घोडे अमोल गवई प्रल्हाद वानखडे मंगेश नावकर रामेश्वर नावकार मोहन खरात किसन खरात राजेश मानकर सचिन गवई पवन नावकर गोपाल डोलारे प्रमोद घोडे शिवचरण घोडे उपस्थित होते.