नांदेड (Nanded):- नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली (Tribute) दिली.
राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली
त्यांच्यासोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.पोलीस दलातर्फे त्यांना हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अत्यसंस्काराला जिल्हातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अतिशय जड अंतकरणाने नागरिकांनी खासदार वसंतराव चव्हाण यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केलीय.