परभणी(Parbhani):- जिंतूर तालुक्यातील मौ.चांदज येथील भागवत कल्याण अंभुरे (वय 13) चिमुकला मुलगा गावातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूक मध्ये सहभागी झाला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणूक गावालगत असलेल्या करपरा नदीपत्राजवळ आली. यावेळी मित्रांसोबत असलेला भागवत याने ही गणपती विसर्जन करण्यासाठी समोर गेला.
दीपात्रात शोध घेतला परंतु कोठेही न आढळल्याने बुधवारी सकाळी पुन्हा गावकऱ्यांनी शोधाशोध केली
यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यामध्ये बुडाला यावेळी गावकऱ्यांनी रात्रभर त्याचा नदीपात्रात शोध घेतला परंतु कोठेही न आढळल्याने बुधवारी सकाळी पुन्हा गावकऱ्यांनी शोधाशोध केली. यावेळी नदी(River) पात्रात गाळामध्ये फसलेल्या अवस्थेत चिमुकल्या भागवत चा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. भागवत हा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. अत्यंत शांत स्वभावाचा मुलगा असल्याने घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह(dead body) ग्रामीण रुग्णालय बोरी येथे पाठविण्यात आला