नांदेड(Nanded):- दरवर्षी ७ जून पासून मृगनक्षत्राची सुरूवात होते. शुक्रवारी मृगाचा पहिला दिवस असल्याने शहरातील वसंतराव नाईक चौकात मोठ्या प्रमाणात मासे (fish) विक्रेते दाखल झाले होते. तब्बल १ टन मासे याठिकाणी विक्रीसाठे आले होते. हे मासे खरेदी करण्यासाठी सकाळपासून शहरातील नागरिक मोठी गर्दी करताना दिसत होते.
वसंतराव नाईक चौकात १ टन माल विक्रीसाठी दाखल
मृग नक्षत्रात मासे खाण्याची एक जुनी परंपरा आहे.त्यामुळे मासहारी व्यक्ती मृगनक्षत्र (Mriganakshatra)साजरी करण्यासाठी या दिवशी मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करीत असतात. त्यामुळे शहरातील वसंतराव चौकात सकाळी ७ वाजल्या पासून विविध प्रकारचे मासे विक्रीसाठी घेवून विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. दररोज येथे दोन – चार विक्रेते मासे विक्रीचा व्यवसाय करीत असतात. परंतू काल मृग असल्यामुळे अनेक विक्रेते दाखल झाले होते. मृगाची सुरूवात मासे खाऊन केली जाते. त्यामुळे काल या भागात मासे खरेदी करताना शहरातील नागरिक दिसत होते.
कतला आणि मरळ माशांना मोठी मागणी
शाहाकारी व्यक्ती रसाळी खाऊन मिरगाचा आनंद साजरा करीत असतात. तर शेतकरी (farmer) या दिवशी आपआपल्या शेतात व मंदिरात जाऊन नाराळ फोडून पुजा करून यंदा चांगला पाऊस(rain) पडावे आणि शेती पिकावी अशी प्रार्थना करतात. मृगाच्या दिवसात सृष्टीची सृजनशीलता आपण उघड्या डोळ्यांनी बघत असतो. सृष्टीची ही कमाल आपल्याला अनुभवता येते. मिरगाच्या पावसाची प्रतीक्षा शेतकर्याइतकीच सामान्य माणूसही करत असतो. मृग नक्षत्राला ग्रामीण भागात मिरग म्हणतात.
मार्केट परिसरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने मासे विक्रेत्यांची रस्त्यावर तंबू टाकून मासे विक्री
मृग नक्षत्राला ७ जून पासून सुरूवात झाली असून काल मिरगाचा पहिला दिवस असल्यामुळे शहरातील तरोडा नाका येथील मच्छी मार्केट(Fish market), वसंतराव नाईक चौका,एमआयडीसी भागातील दुध डेरी मार्केट(Milk Dairy Market), इतवारा मार्केट परिसरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने मासे विक्रेते रस्त्यावर तंबू टाकून मासे विक्री करताना दिसत होते. यावेळी विक्रेत्यांनकडे मोठा कतला, मरळ, छोटा कतला, बगर काट्याची पंकज मासी,कलसकार, पाॅम्पलेट, बल्लो यासह इतर विविध प्रकारचे मासे काल बाजारात विक्रीसाठी आले होते. हे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. यावेळी मरळ आणि कतला माशांना मोठी मागणी असल्याने या माशांना ५०० रूपये किलोचा भाव मिळत होता. मृग नक्षत्र असल्यामुळे मासे मोठ्याप्रमाणात विकले जातात. त्यामुळे कंधार, बारूळच्या तलावातून मोठ्या प्रमाणात मासे विक्रीसाठी आणले आहे. कतला आणि मरळ माशांना बाजारात मोठी मागणी आहे. दररोज आम्ही दोन चार विक्रेते येथे मासे विकत असतो. रविवार , मंगळवार , बुधवार या दिवशी मासे विकले जातात. माल स्वत:चा असेल तर तीन ते चार हजार मिळतात. मार्केट मधून खरेदी केले तर आमची मजूरी निघते. यातून घरचा उदरनिर्वाह चालतो. मिरग असल्यामुळे मासे जास्त आणले आहेत. हे मासे विकले तर १० ते १५ हजार रूपयाचा नफा मिळेल.
बाजारातील माशांचे भाव
मोठा कतला – ५०० रूपये किलो
छोटा कतला – २०० रूपये किलो
मरळ – ५०० रूपये किलो
पाॅम्पलेट – १६० रूपये किलो
बगर काट्याचे पंकज मासे – २५० रूपये किलो
बल्लो – २०० रूपये किलो