लातूर (Latur) :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कामखेडा (ता. रेणापूर) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभैय्या दाने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना छत्रपती चषक २०२५ या भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.
शिवसेना छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते दिनेश मलपे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकडे, शिवसेना ओबीसीचे लातूर जिल्हाध्यक्ष विशाल देवकते, युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, भाजपाचे ओम अप्पा धरणे, मराठा सेवा संघ रेणापूर तालुकाध्यक्ष नागेश एकुरके, एकता प्रतिष्ठान अध्यक्ष विजय कस्पटे , कोंडीराम काळे, एपीआय जाधव, एपीआय चौधरी उपस्थित होते. आयोजन समिती कलास्फूर्ती क्रिकेट क्लब तुषार जोगदंड, बक्षीस देणारे मान्यवर पांडुरंग कलुरे, अशाजी शेख,गोविंद भाऊ साखरे, अमोल वाघमारे, शरद जाधव, राजभैय्या जटाळ, धनुअप्पा नवटके, धोंडीराम तात्या चव्हाण, आकाश बोडके, देव धावणे, गोविंद वाघमारे, औसेकर, चंद्रकांत शिंदे, तुषार जोगदंड, राहुल जटाळ, रामा मेकले, दिनेश भिंगे, नितीन खंडागळे, हरी भिंगे, महादेव पवार, लक्ष्मण बोडके, गोपाळ सोमवंशी, दर्शन बल्लाळ, प्रसाद बल्लाळ, लाला कसमळे. गुरुनाथ कांबळे, करण बिडवे,सत्यम नवटाके, गणेश पोतले, ऋषी पोतले, आकाश खंडागळे मुन्ना खंडागळे, रामा औसेकर, कामखेडा ग्रामस्थ व जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त खेळाडूंनी , क्रिकेट प्रेमींनी यात सहभागी होऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभैय्या दाने यांनी केले आहे.