परभणी(Parbhani) :- जिंतूर तालुक्यातील जिंतूर, परभणी रोडवर पांगरी गावाच्या शेतशिवारात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर (Prostitution business) जिंतूर पोलीसांच्या पथकाने ३१ डिसेंबरच्या रात्री पावने अकराच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पिडित महिलेसह काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी एकूण ५ लाख ४१ हजार ४२० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एकूण ५ लाख ४१ हजार ४२० रूपयाचा मुद्देमाल जप्त
सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल, पोनि.बुध्दीराज सुकाळे, पोलीस अंमलदार भगवान भूसारे, जोगदंड, भाग्यश्री सानप, शेख निशाद यांच्या पथकाने कारवाई केली. पोलीसांना पांगरी शेतशिवारात अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी बनावट ग्राहक पाठविला. या ग्राहकाने इशारा देताच पोलीसांनी छापा टाकला. एका पिडित महिलेची सुटका केली. सदर प्रकरणी आनंत देशमुख, नवनाथ चौरे, देवानंद कनकूटे, शेख मोसीन, गणेश वजीर, शिवाजी वजीर, आनंद कनकुटे, उध्दव घनवटे, शाहरूख पठाण यांच्यावर जिंतूर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.