परभणी/गांगाखेड(Parbhani):- विधानसभा निवडणुकीत मी रासपाच्या चिन्हावर निवडणूक लढत असलो तरी राज्यात कुठेच नाही झाले ते भाजपा महायुतीने गंगाखेड विधानसभेत केल्याने मी भाजपा (BJP)महायुतीचा पुरस्कृत उमेदवार असल्याचे सांगत आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शनिवार २६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परीषद(Press conf) घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीच्या उमेदवाराबाबत होणाऱ्या चर्चेवर पडदा पडल्याचे व विजयानंतर माझा पाठींबा भाजपा महायुतीलाच राहणार असल्याचे सांगितले.
विजयानंतर भाजपालाच समर्थन देण्याचे संकेत
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुतीतुन बाहेर पडत विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढण्याची घोषणा करताच माझ्या अनेक विरोधकांना आनंद झाला होता व रत्नाकर गुट्टेच आता कसं म्हणत इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून भाजपा महायुतीची उमेदवारी मलाच मिळणार असे म्हणत चर्चा रंगविल्या होत्या मात्र शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदार संघात भाजपा अथवा महायुतीचा उमेदवार राहणार नाही असे सांगत महायुतीने तुम्हाला पुरस्कृत केल्याचे सांगितल्याची माहिती आ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका विषद करतांना दिली व भाजपा महायुतीने पुरस्कृत केल्याने गंगाखेड विधानसभा मतदार संघात होणाऱ्या चर्चावर पडदा पडल्याचे सांगत महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार, रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह सर्वच नेत्यांचे आभार मानत सर्व पक्षाचे नेते आणि झेंडे माझ्यासोबत असल्याचे व निवडून आल्यानंतर मी भाजपा महायुतीसोबत असल्याचे आ. रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले, माजी जि. प. सदस्य किशनराव भोसले, रासपा जिल्हाध्यक्ष अँड. संदीप आळनूरे, संदीप वाळके, विधानसभा प्रमुख कृष्णा सोळंके, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, सत्यपाल साळवे, एकबाल चाऊस, राजु खान, माधवराव भोसले, अशोक मुंडे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते