गोंदिया (Arjuni/Mor) :- जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यात मागील 13 ,14 दिवसांपासुन सतत पाऊस (Rain)पडत असल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला. जमीन दलदल झाली. पावसामुळे अनेक रस्ते बंद आहेत त्यातच 1 ऑगस्ट रोजी रात्रि 10:00 वाजताच्या सुमारास नवेगाव/बांध-गोठणगाव मार्गावरील गोठणगाव तलावाजवळील नाल्यावरील पूल खचल्याने गोठणगाव-नवेगाव/बांध मार्गावरील वाहतुक बंद (Traffic stop) करण्यात आली आहे.
पूल खचल्याने या मार्गावरील वाहतुक बंद
यासाठी पर्यायी मार्ग म्हणुन नवेगाव/बांध वरुन गोठणगाव ला किंवा गोठणगाव वरुन नवेगाव/बांध ला जायचे असल्यास पर्यायी रस्ता कवठा किंवा खैरी/सुकळी मार्गाचा अवलंब करुन काळीमाती मार्गे या मार्गाचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी केले आहे. नाला खचल्याने यामुळे नागरिकांना अधिकचा अंतराचा प्रवास करीत गावी जावे लागते. सदर खचलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम (Construction) लवकरात लवकर करुन गोठणगाव-नवेगाव/बांध मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे (Construction Department) केली आहे.