रिसोड (Youth suicide Case) : एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:30: वाजता रिसोड तालुक्यातील गौढाळा येथे उघडकीस आली नारायण रामभाऊ पांढरे वय 50 वर्ष असे मृतकाचे नाव असून याबाबत मृतककाच्या चुलत भाऊ ज्ञानेश्वर पांढरे यांनी रिसोड पोलिसाला दिलेल्या माहितीनुसार नारायण पांढरे हा संध्याकाळी घरी आला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेत असताना गावालगत असलेल्या एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत नारायण हा दिसून आला.
याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना देण्यात आली. मृतक नारायण पांढरे याचा मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी शवावि च्छेधन करून मृतकाच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात आले. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी मर्ग दाखल केला असून आत्महत्याचे कारण मात्र कळू शकले नाही