परभणी(Parbhani) :- विहिरीच्या कठड्यावर बसलेल्या एकाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू (Death)झाला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मानवत तालुक्यातील कोल्हा शेतशिवारात घडली. सदर प्रकरणी ३० ऑक्टोबरला मानवत पोलिस ठाण्यात आकस्माक मृत्यूची (Sudden death) नोंद करण्यात आली आहे.
पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू
बासीराम चव्हाण यांनी खबर दिली आहे. जगन माहेताब चव्हाण (वय ३६ वर्ष) असे मयताचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खबर देणार व त्यांचा भाऊ हा शेतात सालगडी म्हणुन कामाला आहे. शेतातील विहिरीतून जेवणासाठी ताजे पाणी काढत असताना जगन हे विहिरीच्या कठड्यावर बसलेले होते. अचानक तोल जाऊन ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तपास पो.ह. सावंत करत आहेत.