कोरपना (Chandrapur):- चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र पाऊस सुरु असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यातच अनेक छोटे मोठे नाले तुडुंब भरले आहे. यातच भोयगाव येथील एका इसमाच नाल्यावरील पुलावरून रस्ता पार करीत असताना पाण्याचा अंदाज न कळल्याने पाण्यात बुडून जागीच मृत्यू (Death)झाल्याची घटना भोयगाव येथे घडली.
मृतदेह पाण्यात तरंगाताना आढळल्याने खळबळ
कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भरोसा येथील बाळू बारकू तोडसे वय वर्ष अंदाजे ५० असे मृतकाचे नाव असून बाळू हा भोयगाव येथे काल ताना पोळा पाहायला जातो म्हणून भोयगावं येथील ताना पोळा पाहतो आणी नातेवाईकाच्या घरी जातो असे घरच्यांना सांगून सायंकाळी अंदाजे ५ वाजता घरून निघून गेला. परंतु भोयगाव येथील ताना पोळा बघितल्यानंतर कुठेही न जाता त्यांनी गावाकडच रस्ता धरला असता भोयगाव येथील पांनघाटे यांच्या शेताजवळ असलेल्या पुलावर पुराचे पाणी असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व त्यात त्यांचा बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अंदाजे ९ वाजता मृत्यू झाल्याची घटना कळताच भरोसा, भोयगाव येतील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन गडचांदूर यांना कळवले असता गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गडचांदूर येतील पोलीसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनसाठी (Autopsy) गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्या मृत्यू पच्यात एक पत्नी दोन मुले असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यू मुळे शोककळा पसरली असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे