पातूर(Patur):- श्री. बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समिती सरचिटणीस, श्रीराम सेना विदर्भ संघटन मंत्री, कुस्ती मल्लविद्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता (social worker) मंगेश गाडगे यांच्या वाढदिवसानिम्मित दिनांक 22 ऑगस्ट रोजी येथील श्री संत सिदाजी महाराज व्यायाम शाळा, व मंगेश गाडगे मित्र परिवाराच्या वतीने श्री संत सिदाजी महाराज मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मंगेश गाडगे मित्रमंडळीचा स्तुत्य उपक्रम…
रक्तदान शिबिरामध्ये शेकडो युवकांनी रक्तदान (blood donation) केले, हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून सतत चालू आहे. अकोला येथील ठाकरे ब्लड बँक च्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. यावेळी शंभर बॅग रक्त संकलित करण्यात आले. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच महिलांनी सुद्धा रक्तदान शिबिरामध्ये हजेरी लावून मंगेश गाडगे यांना शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये गोपाल राऊत,अमोल अंधारे, प्रकाश तायडे, पवन वर्गे, कृष्णा अंधारे, रवी मानकर, आशिष पवार, सचिन ढोणे, महादेवराव गणेशे, डॉ.साजिद सर, धनंजय मिश्रा, गणेश गाडगे, माधुरी ढोणे, निरंजन बंड, रामा अमानकर, ऍड. पंकज चहकार, सतिश सरोदे, भूषण करंगाळे, गजानन गाडगे, अंकुश पवार, निर्भय पोहरे, प्रवीण निलखन, प्रफुल कुरई सह इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे कार्यकर्ते व मंगेश गाडगे(बजरंगी) मित्रपरिवार अथक परिश्रम घेतले.