Parbhani:- परभणी वसमत रोडवरील असोला पाटी जवळच दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.ही घटना वार मंगळवार 11 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काम आटोपून परभणी वसमत रोडने बाभळी गावाकडे जात असताना अपघात
याबाबत सविस्तर माहिती अशी की परभणी तालुक्यातील असोला येथुन जवळच असलेल्या बाभळी येथील सुर्यकांत मोतीराम आनेराव वय 44 व दिपक सुभाषराव लोखंडे वय 25 दोघे जन MH 22-M-8288 या दुचाकीने परभणी येथील काम आटोपून परभणी येथुन परभणी वसमत रोडने बाभळी गावाकडे जात होते. परभणी वसमत रोडवरील असोला पाटी जवळ त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुर्यकांत मोतीराम आनेराव वय वर्षे 44 यांचा मृत्यू(Death) झाला. तर दिपक सुभाषराव लोखंडे हे गंभीर जखमी झाले झाल्याचे काही नागरिकांनी पाहिल्यानंतर जखमी दिपक लोखंडे यांना परभणी येथील एका खासगी रुग्णालयात(hospital) दाखल केले. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून दुचाकी चे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे. अपघाता नंतर वाहनचालकांने वाहनांसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनास्थळी ताडकळस पोलिस ठाण्याचे(Police stations) सहायक पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांनी भेट दिली. या घटनेची ताडकळस पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आली असून अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.