आखाडा बाळापूर (Hingoli) :- कळमनुरी तालुक्यातील वडगाव ते रामेश्वर तांडा रस्त्यावर डिग्रस बु शिवारात दुचाकीस पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident)एकाचा मृत्यू झाला सदर प्रकरणी गुरुवारी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील गजानन शेषराव काकडे (48) हे 19 मार्च रोजी सात वाजता दुचाकी एम एच 38एन 7494 ने वडगाव येथून बेलथर गावाकडे जात असताना वडगाव ते रामेश्वर तांडा रस्त्यावर डीग्रस बु शिवारात पाठीमागून येणारी दुचाकी एम एच 26 ए एन 7153 ने जोराची धडक दिली यात गजानन काकडे गंभीर जख्मी होउन मृत्यू झाला. सदर प्रकरणी गुरुवारी दशरथ सखाराम काकडे फिर्यादीवरून दुचाकी चालक ,एम एच 26 एएन 7153 विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुनील रिठे करत आहेत.